इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे येथील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात अल्पवयीन कारचालक युवकाला बाल न्याय मंडळाने रविवारी जामीन मंजूर केला. तो मंजूर करतांना ज्या अटी शर्ती घातल्या त्यात पंधरा दिवस वाहतूक नियमनाचे काम करावे, अपघातावर तीनशे शब्दाचा निंबध लिहावा, वाहतूक जागृती फलक रंगवावेत आणि व्यसनमुक्तीसाठी डॅाक्टरांचे उपचार व मानसोपचार तज्ञांचे समुदेशन घ्यावे असे सांगितले होते. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, ओला, उबर, ट्रक ड्रायव्हर यांच्याकडून जर चुकून अपघात झाला, त्यांच्या हातून जर कुणाचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षाची शिक्षा होते. पण, श्रीमंत बापाचा पोरगा दारु पिऊन पोर्श गाडी चालवून दोन लोकांची हत्या करतो तर त्याला निबंध लिहायला सांगितले जाते. उबर, ट्रक ड्रायव्हर यांच्याकडून निबंध लिहून का घेतला जात नाही. एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांना विचारलं गेलं, इथे दोन भारत निर्माण होतायेत. एक गरिबांचा भारत आणि दुसरा श्रीमंतांचा भारत. त्यावर मोदी म्हणाले, मग मी काय सगळ्यांना गरीब बनवू..इथे प्रश्न न्यायाचा आहे. गरीब आणि श्रीमंतांनाही न्याय मिळायला हवा, न्याय सगळ्यांना सारखा हवा, त्यासाठीच तर आम्ही अन्यायविरोधात लढतो आहोत.
या प्रकरणात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यात राहुल गांधी यांची ही प्रतिक्रिया आली आहे.