नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चेहडी पंपीग भागात दारणानदीत पाय घसरून पडल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पियूष दयाराम सावंत (रा.डोंगरगाव ता.देवळा) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पियूष सावंत शनिवारी (दि.१८) महेश भाऊराव सावंत या मित्रासमवेत चेहडी पंपीग येथील महादेव मंदिरात गेला असता ही घटना घडली. मंदिर परिसरातून जात असतांना पाय घसरल्याने तो दारणा नदीपात्रात बुडाला होता. मित्राने वेळीच आरडाओरड केल्याने स्थानिकांनी धाव घेत त्यास पाण्याबाहेर काढले होते.
गंभीर अवस्थेत भाऊसाहेब देवरे यांनी त्यास तात्काळ मॅग्नम हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाइक पाटील करीत आहेत.