मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजकाल मोदीजी अपशब्द बोलत आहेत आणि रस्त्यावरची भाषा बोलत आहेत. मोदींची शरद पवार यांना भटकती आत्मा तर उद्धव ठाकरे नक़ली संतान म्हणत आहे. हा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या या अपमानाचा बदला तुम्ही सर्वांनी मतदान करून घ्यावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ज्याचे प्रेम आहे त्यांनी नरेंद्र मोदींना नकार द्यावा असे आवाहन दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
मुंबई येथे शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त प्रचार ‘परिवर्तन सभा’ वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर पार पडली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या सभेत केजरीवाल म्हणाले की, मी तुरुंगातून निवडणूक निकाल पाहणार आहे, यावेळी जर भारत आघाडीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या तर मला तुरुंगात खूप शांतता मिळेल असेही त्यांनी सांगितले.
या सभेत उध्दव ठाकेर म्हणाले की, एका बोटाच्या ताकदीवर हुकूमशाही गाडून टाका. परिवर्तन करा. इतिहास घडवा. या सभेत हुकूमशाही आता गाडायचीच, मुळासकट उपटून टाकायची हा एल्गार इथे उपस्थित जनतेच्या उत्साहात दिसत असल्याचा सूर नेत्यांच्या भाषणात होता.
देशासाठी, संविधान रक्षणासाठी, लोकशाहीसाठी ही INDIA एकजूट कायम ठेवावी लागणार, असेही यावेळी सांगण्यात आले.