नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गतिशील विकासाला प्राधान्य देणाऱ्या महायुती सरकारने मागील दशकभरात समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणाचा मार्ग प्रशस्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते महामार्गाच्या नेटवर्कमुळे सामाजिक आर्थिक विकासाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळाली आहे. विकासाला प्राधान्य देणारी नाशिकची जनता यावेळीही महायुतीला बहुमतांनी विजयी करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. या सभेला मोठी गर्दी होती.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.माणिकराव कोकाटे,आमदार सीमा हिरे,आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर अशोक मुर्तडक, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, लक्ष्मण सावजी,प्रशांत जाधव, दिनकर पाटील, सलीम शेख यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळांनी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशात महामार्गाचे मोठ जाळ निर्माण करण्यात आलं आहे. त्यांच्याकडे सशक्त भारताची दृष्टी आहे आणि २१ व्या शतकातील राजकारण हे प्रगती आणि विकासाचे राजकारण आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांचे लक्ष नेहमीच कर्तृत्वावर असते. त्यांनी अनेक कामे विक्रमी वेळेत पूर्ण केली. नितीन गडकरी हे विकासाचे व्हिजन असलेल देशातील एक महत्वाचे नेतृत्व असून त्यांच्या या कार्याबद्दल ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भुजबळ म्हणाले की, पुढील काळात नाशिक मुंबई महामार्ग, नागपूरच्या धर्तीवर सारडा सर्कल ते नाशिक रोड तीनमजली उड्डाणपूल, मेट्रो साकारण्यात येईल. आगामी काळात नाशिकला कुंभमेळा होतो आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासासाठी नरेंद्र मोदीजी यांच्याकडून आपल्याला भरघोस असा निधी प्राप्त होईल. नमामि गंगे – नमामि गोदा हे प्रकल्प मार्गी लावला जाईल.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1791483072640340413