इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील सभेत कांदा उत्पादक शेतक-यांनी गोंधळ करु नये यासाठी पोलिसांनी सर्व खबरदारी घेतली. एक दिवस अगोदर काही आंदोलक शेतक-यांना प्रतिबंधात्मक नोटीस देऊन त्यांना नजरकैदेत ठेवले. त्यानंतर सभेच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेऊन गाड्या चेक केल्या. पण, कांदावर बोला या एका घोषणेने या सभेत एका तरुण शेतक-यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
मोदींचे भाषण सुरु झाल्यानंतर या तरुणांने घोषणा देणे सुरु केले. त्यानंतर मोदी काही वेळ थांबेल. पण, पोलिसांनी या तरुणाला बाहेर काढले. पण, या घोषणेने कांद्याचा प्रश्न मात्र किती तीव्र आहे. याची जाणीव सभेत करुन गेला. या सर्व प्रकारानंतर थोड्या वेळाने मोदी हे कांद्यावर बोलले मात्र ठोस काही सांगितले नाही. ते म्हणाले की, गेल्या हंगामात सात लाख टन कांदा खरेदी केला, आमच्या सरकारने पहिल्यांदा त्याच्या साठवणुकीची व्यवस्था केली, गेल्या दहा वर्षांत कांद्याची निर्यात ३५ टक्क्यांनी वाढली आहे. दहा दिवसांपूर्वी कांदा निर्यातीवरील निर्बंध हटविले असून दहा दिवसांत २२ हजार टन कांदा निर्यात झाला आहे. कांद्याच्या वाहतुकीवर सबसिडी देण्याची योजना लागू करण्यात येत आहे.
या घोषणेअगोदर सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री व उमेदवार डॅा. भारती पवार यांनी जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष उत्पादकांची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने विशेष योजना आखल्या आहेत. कांदा, द्राक्षे निर्यातीसाठी सरकारने अनुदान दिले, नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे नुकसान झाले तर तातडीने भरपाई दिली जाते. कांदा चाळींना अनुदान दिले जाते. कांदा प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे, बँकांकडून वन टाईम सेटलमेंटच्या माध्यमातून मदत केली जात आहे, अशी माहिती दिली.
पण, या सर्व स्पष्टीकरणानंतरही कांदा उत्पादक शेतक-यांचे मात्र समाधान झाले नाही. जिल्ह्यातही या प्रश्नावरुन संताप कायम असल्याचेच समोर आले. उलट नजरकैद करुन संतापात वाढ झाल्याचे चित्र दिसले..