नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन काम करुन देण्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून नंदुरबार येथील जिल्हा शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी हे ५० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले गेले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना नवापूर शहर, नगरपालिका, मालमत्ता क्र. ८२६, सीटी सर्वे क्र. ६२४, पंचरत्न शॉपिंग, काँप्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरु करावयाची असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL ३ परवाना देण्यास हरकत घेतली परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभाग कडून सादर शाळा बंद असले बाबत प्रमाणपत्र देणेसाठी तसेच अशरफ भाई माजिदभाई लखानी अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माद्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे बदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून आलोसे यांनी ५००००/- ची मागणी करुन आज दि. १५/०५/२०२४ रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष आलोसे यांचे जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात ५००००/- लाच घेताना रंगेहाथ पकडले असून यातील आलोसे यांचेवर नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरूष वय-३५
आलोसे-सतिष सुरेश चौधरी, वय ५२ वर्षे, जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नंदुरबार, वर्ग-१, रा. प्लॉट नंबर ५२, शांतीनगर, वाघेश्वरी मंदिराजवळ, नंदुरबार (अरविंद देसले यांचे घरात) मु.रा. प्लॉट नंबर ८, गट नंबर ३५, मुक्ताईनगर, तालुका जिल्हा-जळगांव
*लाचेची मागणी- ५००००/-
*लाच स्विकारली- ५००००/-
*हस्तगत रक्कम- ५००००/-
*लाचेची मागणी – दि.१५/०५/२०२४
*लाच स्विकारली – दि.१५/०५/२०२४
तक्रार:-तक्रारदार यांना नवापूर शहर, नगरपालिका, मालमत्ता क्र. ८२६, सीटी सर्वे क्र. ६२४, पंचरत्न शॉपिंग, काँप्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरु करावयाची असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL ३ परवाना देण्यास हरकत घेतली परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभाग कडून सादर शाळा बंद असले बाबत प्रमाणपत्र देनेसाठी तसेच अशरफ भाई माजिदभाई लखानी अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माद्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे बदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून आलोसे यांनी ५००००/- ची मागणी करुन आज दि. १५/०५/२०२४ रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष आलोसे यांचे जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात ५००००/- लाच घेताना रंगेहाथ पकडले असून यातील आलोसे यांचेवर नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.आलोसे यांचे सक्षम अधिकारी-मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- सापळा अधिकारी -श्री.नितीन पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
*सापळा पथक – पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, पो.ना. गणेश निंबाळकर