नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– द्वारका परिसरातील गणेशनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९२ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याच्या अलंकारांचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेखा प्रविण विधाते (रा.चंद्रभाग्य कॉम्प्लेक्स, मथुरा हॉटेल मागे,गणेशनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विधाते या गुरूवारी (दि.९) सकाळी मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी बंद घराची कडी उघडून लोखंडी कपाटात ठेवलेली सोन्याचा पोहे हार व मंगळसुत्र असा सुमारे ९२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवांदे करीत आहेत.