इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील कृष्णा या गावातील चौथी वर्गात शिकवणाऱ्या वंशीबेन मनीषभाई हिचा हा निकाल चांगलाच व्हायरल होत आहे. तीला गुजराती या विषयामध्ये २०० पैकी २११ तर गणित या विषयामध्ये २०० पैकी २१२ गुण मिळाले. ही गुणपत्रिका सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर शाळेने नवीन मार्कशीट तिला दिली असली तरी तिचा पहिला निकाल मात्र चर्चेत आहे.
सोशल मीडियावर बी.सिंग नावाच्या युजरने हे मार्कशीट ट्विट केले आहे. गुजरात मॉडल हे कॅप्शन देऊन हे मार्कशीट दिले आहे. त्यावर जोरदार प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पण, निकालात अशी चुक कशी होती हे महत्त्वाचे आहे.
नवीन गुणपत्रक
या सर्व चर्चेनंतर शाळेने नवीन गुणपत्रक दिले असून त्यात गुजरातीमध्ये २०० पैकी १९१ आणि गणितामध्ये १९० गुण मिळाले. बाकी विषयामध्ये काहीच बदल झाले नाही. एकूण १००० पैकी ९३४ गुण तिला दिले आहे.