नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघात तिढा सुटलेला नसतांना आज महायुतीमध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहे. महाजन आज तडकाफडकी नाशिकला आले. त्यानंतर त्यांनी एका हॅाटेलमध्ये पदाधिका-यांसोबत बंद दाराआड गुप्त बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी महायुतीची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या हालचाली नेमक्या कशासाठी सुरु आहे याबबात मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे.
महायुतीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी गिरीश महाजन यांनी संवाद साधला ते म्हणाले की, आज बैठक झाली, उमेदवारी कुणाला यावर चर्चा झाली नाही. याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, उद्यापर्यंत निर्णय अपेक्षित आहे. दोनमेला उमेदवारी अर्ज भरायचे आहे. त्यावर आज चर्चा झाली. मोठ्या प्रमाणात यासाठी तयारी सुरू आहे. उमेदवारी जाहीर करण्यात उशीर झाला असलातरी फार फरक पडणार नाही. नाव कुणाचे ही येऊ द्या आम्ही सगळे मिळून काम करू असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही दोन्ही जागा निवडून आणू, यावेळी त्यांनी भुजबळांच्या भेटीची माहिती दिली. नाशिक आणि भुजबळ यांचे जून नातं आहे. त्यांना इथल्या परिस्थिती आणि गोष्टींचे जाण आहे त्यासाठी त्यांची भेट घेतली.