इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघातून सोमवारी शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरतांना शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरल्यामुळे राजकारण मोठी खळबळ निर्माण झाली. तर दुसरीकडे दुसरीकडे मंहत अनिकेत शास्त्री यांनी भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी अर्ज घेतला आहे. नाशिकमधून आपणच भाजपचे उमेदवार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर आज अर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेने अधिकृत घोषणा केलेली नसतांना महाराज व महंत यांनी थेट दावा केल्यामुळे या पक्षांवरही दबाव वाढला आहे. खरं तर जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोणीही उमेदवार असे दावा करत नाही. पण, महाराज व महंत यांनी असा दावा केल्यामुळे राजकीय नेत्यांना मात्र घाम फुटला आहे. आता महायुती कोणाला उमेदवारी देते की तिस-याला संधी देते हे बघणे महत्त्वाचे आहे.
जोरदार शक्तीप्रदर्शन
सोमवारी शांतीगिरी महाराजांनी गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यानंतर त्यांनी हा दुसरा अर्ज दाखल केला. याअगोदर त्यांनी दोन दिवसापूर्वी पहिला अर्ज अपक्ष भरला होता. एकुण चार अर्ज त्यांनी घेतले आहे.
एबीफॅार्म जोडला नाही
नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्याअगोदर शांतीगिरी महाराजांनी अर्ज भरल्यामुळे शिवसेना गटाच्या स्थानिकांना मोठा धक्का बसला. पण, या अर्जाबरोबर एबी फॅार्म जोडलेला नसल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे हा उमेदवारी अर्ज भरतांना वरिष्ठांनी काही सुचना दिल्या असल्याचे बोलले जात आहे. शातीगिरी महाराज यांचे नाव निश्चित झाले असावे असेही बोलले जात आहे. एबीफॅार्म नंतर जोडला तरी चालतो असेही काहींचे म्हणणे आहे.