येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुक्यातील राजापूर-ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर हरणांसह अन्य वन्यप्राण्यांची मोठी संख्या आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे वन्यप्राणांचे पाण्यासाठी हाल होत असल्याने वनविभागाने ठिकठिकाणी वॉटर होल बनविले आहे. त्यात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था सुध्दा केली आहे. याच वॉटर होल मध्ये पाणी पिण्यासाठी मोर, लांडोर आले असता त्यांचे पाणी पितांना ,पिसारा फुलवत नाचतांनाचे सुंदर दृश्य हे वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.