इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केल्यानंतर या ठिकाणी महायुतीमध्ये तणाव होता. या तणावानंतर आता काँग्रेसचे नेते ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उतरले आहे. पलुस तालुक्यातील खटाव,ब्रम्हनाळ,माळवाडी,भिलवडी येथे माजी मंत्री विश्वजीतजी कदम, आ.अरुण आण्णा लाड, महेंद्र आप्पा लाड, शरद भाऊ लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली, यावेळी मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर प्रचारही करण्यात आला.
या मतदार संघात काँग्रसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे रिंगणात असून त्यामुळे काँग्रेसचे नेते प्रचारात उतरतील का असे विचारले जात होते. पण, आता सर्व काँग्रेसचे नेते प्रचारात उतरल्यामुळे येथील तणाव काहीसा निवळला आहे. गेले तीन महिेने सांगलीच्या जागेवरुन तिढा सुरु होता. या जागेवर काँग्रेसचा दावा असतांना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करुन टाकला. त्यामुळे येथील उमेदवारी चांगलीच चर्चेत आली. काँग्रेसच इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे महायुतीत मोठा तणाव होता. पण, आता त्याला पूर्णविराम देत काँग्रेसचे नेते प्रचारात उतरले आहे.