इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बारामतीतमधील गावागावात धमक्या देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काल आमदार रोहित पवार यांनी बुथ लावण्यावरुन धमक्या देत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी हा आरोप केल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
राऊत म्हणाले की, व्यापारी आणि उद्योजकांना नोटीस पाठविण्यात येत आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची भाषा सुरु आहे. जनता मात्र कुणाच्या पाठिशी आहे, हे लवकरच कळेल, हे त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या देत आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने अजित पवार गावागावातल्या लोकांना धमक्या देतात. मला मताधिक्य नाही दिले तर बघून घेईन, अनेक वर्ष आपण विधानसभेत आहात ही भाषा तुम्हाला शोभते का? निवडून यायचे असेल तर लोकांना निर्णय घेऊ द्या तुम्ही खरे की शरद पवार खरे, असेही त्यांनी सांगितले.