इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंढरपूर: माढा लोकसभेत बंडखोरीमुळे ही जागा भाजपसाठी अवघड झालेली आहे. त्यासाठी आता या जागेकडे विशेष लक्ष घातले आहे. या मतदार संघात ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माजी उपमुख्यमंत्री विजयसिेंह मोहिते पाटील यांचे होमग्राऊंड असलेल्या माळशिरसमध्ये सभा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.
शरद पवार यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्यानंतर भाजपने थेट मोहिते-पाटील यांच्या होमग्राऊंड माळशिरस शहराला चिटकून असलेल्या कृषी विभागाच्या २८ एकर जागेची सभेसाठी निवड केली आहे. आता या मैदानाचे सपाटीकरणासोबत सभेसाठी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे . यासाठी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे जयकुमार शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी येथे तळ ठोकून आहेत .
माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे ही जागा चांगलीच चर्चेत आली आहे.