इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यात लोकसभा निवडणुकीतील सात जागेवारील महायुतीमधील तिढा शनिवारी सुटला असला तरी एकच उमेदवारी जाहीर करण्यात आला आहे. अद्याप सहा जागेवरील उमेदवार जाहीर करणे बाकी असून ते आज होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील तिढा सुटल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी सांगितले आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापूरमध्ये असल्यामुळे सगळे नेते गर्दीत होते. तरीपण तीन तास हॅाटेलच्या एका रुममधून मुख्यमंत्री तीन तास फोनवरुन चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. या जागेवरील तिढ्याबाबतच ही चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे. भाजपने उज्वल निकम यांची उमेदवारी घोषीत केली असून उर्वरीत जागेवर मात्र उमेदवार जाहीर केलेले नाही.
उर्वरीत सहा जागेमध्या नाशिक लोकसभा मतदार संघासह ठाणे येथील मतदार संघाच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार असून त्यात नाशिकहून हेमंत गोडसे तर ठाणे येथून आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
गेला महिनाभर या दोन्ही जागांवरुन शिवसेना, भाजपमध्ये रस्सीखेच सुरु होती. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीने दावा केला होता. त्यामुळे हा तिढा सुटत नव्हता. पण, आता हा तिढा सुटला असून शिवसेनेच्याच वाट्याला या दोन्ही जागा जाणार आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तर नाशिकमध्ये विद्यमान खासदार आहे. त्यामुळे या दोन्ही जागावर शिंदे गट ठाम असून त्यामुळे या जागा त्यांच्याच पारड्यात पड्ल्या असल्याचे बोलले जात आहे.