नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवापूर पोलीस ठाण्यातील निरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण वारे ५० हजारांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी अटक केली होती. त्यानंतर नंदुरबार एसीबीने वारे यांच्या घराची झडती घेतली असता त्यात तब्बल २५ लाख ७ हजारांचे घबाड सापडल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात वारे यांना गुरुवारी नंदुरबार न्यायालयात हजार केल्यानंतर त्यांना तीन दिवसांची अर्थात २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गुन्ह्यात आरोपीला अटक न होवू देण्यासाठी वारे यांनी अडीच लाखांची लाच मागितली व त्यावेळी ५ मार्च रोजी वारे यांनी एक लाख रुपये घेतले व त्यानंतर पुन्हा दीड लाखांची मागणी वारे यांनी केली. यावेळी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर वारे यांनी ५० हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. निरीक्षक वारे यांनी राहत्या घरातच ५० हजारांची लाच स्वीकारताच त्यांना एसीबीने अटक केली.