इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणात ईडीने प्रवीण राऊत आणि त्याच्या जवळच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे परिसरात आणि आसपासच्या परिसरात असलेल्या अनेक जमीनींचा समावेश असलेल्या ७३ कोटी ६२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. आतापर्यंत एकूण या प्रकरणात ११६ कोटी २७ लाखची मालमत्ता जप्ती केली आङे.
पत्राचाळ प्रकरणात ईडीने पीएमएलए, २००२ च्या तरतुदींनुसार ही कारवाई केली आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यांचीही काही मालमत्ता या प्रकरणात जप्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही कारवाई करण्यात आली आहे.