मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ३१७ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : रायगड १३, बारामती ३८, धाराशीव (उस्मानाबाद) ३१, लातूर २८, सोलापूर २१, माढा ३२, सांगली २०, सातारा १६, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ९, कोल्हापूर २३, हातकणंगले २७ अशी आहे.