इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूर आगार येथे एस.टी. बसचे चालक यांच्याकडे अर्जित रजा व रजा रोखीकरण मंजूर केल्याचा मोबदला म्हणून दोन हजाराची लाच घेतांना आगार व्यवस्थापक बालाजी वसंतराव आडसुळे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार एस.टी. बसचे चालक (ड्रायव्हर)यांच्या घरी लग्नकार्य व घराचे बांधकाम असल्याने त्यांनी २०२४-२५ वर्षातील १५ दिवस अर्जित रजा व १५ दिवस रजा रोखीकरण मंजूर होण्याकरिता २० मार्च रोजी आगार व्यवस्थापक आडसुळे यांचेकडे अर्ज दिला होता. सदर रजा मंजूरीच्या अनुषंगाने तक्रारदार ५ एप्रिल रोजी आगार व्यवस्थापक बालाजी आडसुळे यांचेकडे गेले असता आडसुळे यांनी अर्जित रजा व रजा रोखीकरण मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडे दोन रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर आज लातूर आगारात कर्तव्यावर हजर होताच सदर लाचेची रक्कम आडसुळे यांनी स्वतःचे कार्यालयात शासकीय पंचासमक्ष स्वतः स्विकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस स्टेशन शिवाजी नगर, लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.
यशस्वी सापळा कारवाई
*युनिट :- लातूर
*तक्रारदार :- पुरुष, वय 43 वर्षे
आरोपी :- बालाजी वसंतराव आडसुळे, वय 50 वर्षे, पद आगार व्यवस्थापक (वर्ग 2*), नेमणूक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, लातूर
आगार, लातूर
*तक्रार प्राप्त :- दि.08/04/2024
*लाच मागणी पडताळणी:- दि.08/04/2024
*लाचेची मागणी रक्कम:- 2,000/- रुपये
*लाच स्वीकृती व हस्तगत रक्कम :- दि.22/04/2024 रोजी 2,000/- रुपये
थोडक्यात हकिकत :- यातील तक्रारदार हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग, लातूर आगार येथे एस.टी. बसचे चालक (ड्रायव्हर) आहेत. त्यांचे घरी लग्नकार्य व घराचे बांधकाम असल्याने त्यांनी सन 2024-2025 वर्षातील 15 दिवस अर्जित रजा व 15 दिवस रजा रोखीकरण मंजूर होण्याकरिता दि.20/03/2023 रोजी आगार व्यवस्थापक आडसुळे यांचेकडे अर्ज दिला होता. सदर रजा मंजूरीच्या अनुषंगाने तक्रारदार हे दि.05/04/2024 रोजी आगार व्यवस्थापक बालाजी आडसुळे यांचेकडे गेले असता आडसुळे यांनी अर्जित रजा व रजा रोखीकरण मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडे 2,000/- रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे तक्रार केली. दि.08/04/2024 रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक आडसुळे यांनी तक्रारदार यांना 2,000/- रुपये लाचेची मागणी केली. दरम्यानच्या कालावधीत आरोपी लोकसेवक आडसुळे हे शिखर शिंगणापूर येथे यात्रा कर्तव्य बजावण्याकरिता गेले होते. आज दि.22/04/2024 रोजी लातूर आगारात कर्तव्यावर हजर होताच सदर लाचेची रक्कम आडसुळे यांनी स्वतःचे कार्यालयात शासकीय पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.त्यावेळी आरोपीस सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. पोलीस स्टेशन शिवाजी नगर, लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.यापूर्वी सन 2015 मध्ये देखील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, लातूर आगार येथे आगार व्यवस्थापक यांचे केबिनमध्ये वाहक नानजकर यांना 7000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी लातूर पथकाने कारवाई केली होती.
मार्गदर्शक:- डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
*पर्यवेक्षण अधिकारी:- संतोष बर्गे, पोलीस उप अधीक्षक,
*सापळा पथक:- भास्कर पुल्ली पोलीस निरीक्षक व टीम अँटी करप्शन ब्यूरो, लातूर.
*तपास अधिकारी:- भास्कर पुल्ली पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्यूरो, लातूर.