इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नसल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केल्यानंतर आता मनोज जरांचे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. लय फडफड करत होता. स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला काय माहिती? असे सांगत त्यांनी भुजबळांवर निशाणा साधला.
जरांगे म्हणाले, की, लय फडफड करत होता. स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला काय माहीत?..दिसत नाही अजून.. बर्फात जाऊन झोपला का काय हिमालयात. पूर्वी आपला समाज एकत्र येत नव्हता. त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला. आपला छळ केला; पण आता समाज एक झाला आहे. लो
कसभा निवडणुकीत तुम्हाला कुणाला पाडायचं आहे, त्यांना पाडा; पण पाडताना एवढ्या ताकदीने पाडा, की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्यांना उभे राहता येणार नाही. एवढी ताकद यावेळी मराठ्यांनी दाखवावी.