नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वंचित बहुजन विकास आघाडीने दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी मालती शंकर थलवी यांची उमेदवारी घोषीत केली आहे. दरम्यान वंचितने दिंडोरीत उमेदवार घोषीत केलेला असतांना नाशिकमध्ये करण गायकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे जिल्हयात वंचितच्या या दोन्ही उमेदवारांची चर्चा आहे.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार डॅा. भारती पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित होते. पण, आता माकपतर्फे जे.पी.गावीत हे उमेदवारी करण्यावर ठाम आहे. तर वंचितने उमेदवारी घोषीत केल्यामुळे चौरंगी लढत होणार आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेन ठाकरे व शिंदे गट यांच्यात सरळ लढत असली तरी वंचितमुळे येथे तिरंगी लढत होणार आहे.