इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे (४५) यांनी मुंबईत आत्महत्या केली. वांद्रे पूर्वेकडील पश्मिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर त्याने गळफास घेतला. हा तरुण अंबड तालुक्याचा असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले. या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दयावरुन राजकीय वाद पेटणार आहे.
या आत्महत्येनंतर विनोद पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका!
सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही.
यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!