इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात नाशिकच्या दोन महिलांना अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. या दोन्ही महिला ललित पाटील फरार झाल्यानंतर संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम असे अटक केलेल्या दोन महिलांचे नाव आहे.
कालच पोलिसांनी याबाबत एका महिलेला ताब्यात घेतल्याचे सांगितले होते. पण, तीचे नाव पुढे आले नाही. आता दोन्ही महिलांचे नावही समोर आले आहे. आज पहाटे या दोन्ही महिलांना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ललित पाटील हा एक दिवस प्रज्ञा कांबळेकडे येऊन राहिला होता. येथे त्याने चांदी ठेऊन २५ लाख रुपये घेतले होते. त्यामुळे पोलिसांना ललित पाटील याची बेनामी संपत्ती प्रज्ञाकडे असण्याचा संशय आहे. त्यामुळे तीची कसून चौकशी केली जात आहे.
प्रज्ञा कांबळेला कालच घेतले होते ताब्यात
ड्रग्ज माफिया ललीत पाटील हा फरार झाल्यानंतर तो नाशिकला एका महिलेकडे दिवसभर थांबल्याचे समोर आले आहे. या महिलेचा गुन्हेशाखा युनिट-१ ने शोध घेऊन तिला अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात दिले. या महिलेकडे ५ लाख, १२ हजार रूपये किंमतीची ७ किलो चांदी मिळाली आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर ललीत पाटील याने चांदी घेऊन न जाता २५ लाख रूपये अशी रोख रक्कम घेऊन गेल्याचे सांगीतले. सदर महिलेस पुढील चौकशीकामी पुणे पोलीसांच्या ताब्यात देण्यात येत असल्याची माहिती कालच पोलिसांनी दिली होती.
नाशिक, पुणे व मुंबई पोलीसांकडून घेण्यात येत होता. त्या दरम्यान नाशिक पोलीसांना याबाबत माहिती मिळाली होती की, ललीत पाटील याने पुणे येथून पलायन केल्यानंतर तो नाशिक येथे येऊन गेला होता. त्याने एका महिलेकडे एक दिवस वास्तव्यास केले होते. त्या ठिकाणी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची गोपनीय संशयास्पद माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन या महिलेला शोधून तीच्यावर कारवाई केली.