व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, November 30, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एकनाथ खडसेंसह त्यांच्या पत्नी अडचणीत…१३७ कोटींचा दंड भरावा लागणार?

India Darpan by India Darpan
October 19, 2023 | 11:41 am
in संमिश्र वार्ता
0


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव – एकेकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून राजकीय वजन आणि नावलौकिक असलेले माजी मंत्री व विद्यमान आमदार एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गटात ) असून त्यांच्या वरील चौकशी आणि कोर्टकचेऱ्यांचा ससेमिरा मात्र अद्यापही सुरूच आहे, शिसेना भाजप युती सरकारच्या मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे यांचे स्थान मंत्रिमंडळात वरच्या क्रमांकावर होते, मात्र कालांतराने त्यांच्यावर अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप होत गेले. त्यातून भाजपमधूनच काही नेत्यांनी त्यांना अंतर्गत विरोध सुरू केला, त्यातच एकनाथ खडसे हे चौकशीच्या फेऱ्यात अडकत गेले, सध्या देखील अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यातील एका शेतजमिनीवरील खनिज प्रकरणी चर्चेत आले आहेत. एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व अन्य ६ शेतकऱ्यांना तहसीलदारांनी नोटीसा बजावल्या आहेत, या प्रकरणामुळे केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

नागपूरमध्ये मागील वर्षी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर सनसनाटी आरोप केला होता. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमध्ये गौण खनिज घोटाळा झाला असून सुमारे ४०० कोटींचा महसूल बुडवला असल्याचे आरोप केला होता. या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आल्याने खडसे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवैधरीत्या १ लाख १८ हजार ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. या धक्कादायक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सातोड (मुक्ताईनगर) येथील खडसे दांमत्यासह सहा जमीनमालकांना मुक्ताईनगर तहसीलदारांनी या नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी १ लाख १२ हजार ११७ इतके आहे. यापोटी पाच पटींनी दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

उत्खननाशी आमचा दुरान्वये संबंध नाही
या कारवाईवर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्य शासनाने यासाठी एसआयटी स्थापन केली होती. पथकाने सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला आहे. त्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. सारे राजकीयदृष्ट्या सुरू आहे. शेतजमिनी आमच्या नावावर असल्या, तरी अवैध गौण खनिजाच्या उत्खननाशी आमचा दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ असे ते म्हणाले.
Eknath Khadse and his wife in trouble…137 crores fine will have to be paid?


Previous Post

नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरणात दोन महिलांना पोलीसांनी केली अटक…..फरार झाल्यानंतर ललित पाटीलच्या होत्या संपर्कात

Next Post

गौतम अदानींचा पाय आणखी खोलात… सेबीने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

गौतम अदानींचा पाय आणखी खोलात… सेबीने घेतला हा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

अन्न औषध प्रशासनाची विशेष मोहीम; २९ लाख ६६ हजार रूपयांचा साठा जप्त, २२२ आरोपींना अटक

November 30, 2023

येवला व निफाड तालुक्यातील अवकाळीने झालेल्या नुकसानीची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी..

November 30, 2023

सॅम बहादूर चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चा….विकी कौशल, फातिमा शेखचा कसदार अभिनय ( बघा व्हिडिओ)

November 30, 2023

भरधाव दुचाकी घसरल्याने ४५ वर्षीय चालकाचा मृत्यू

November 30, 2023

या स्वायत्त महाविद्यालयांवर कारवाई होणार.. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत निर्णय

November 30, 2023

राष्ट्रवादीत बंड करण्याचे कारणच सुनील तटकरेंनी सांगत केला गौप्यस्फोट

November 30, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.