नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथील राका प्रिंटर्सचे संचालक प्रशांत राका यांचे चिरंजीव उत्सव राका याने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तो देशात २७० व्या क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे. त्याने तिस-या प्रयत्नात हे य़श मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उत्सव राकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वडाळा येथील अशोक युनीव्हर्सल स्कुलमध्ये झाले. त्यानंतर त्याने ११ वी १२ वी राजस्थानच्या कोटा येथून केले. त्यानंतर तो सिव्हिल इंजिनिअर झाला. इंजिनिअर झाल्यानंतर युपीएससीच्या परिक्षेसाठी तो दिल्लीत गेला. येथे जीतोच्या होस्टेलच्या मध्ये राहून त्याने सेल्फ स्टडी करुन हे य़श मिळवले. त्याच्या या यशात आई सुनीताचा मोठा वाटा आहे. त्याचा लहान भाऊ समकित हा आर्किटेक्चरच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे . तो सुद्धा अभ्यासात हुशार आहे
यावेळेस या परिक्षते जिल्हयातील चार मुलांनी यश मिळवले आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील विनय सुनील पाटील हा ११३ क्रमाकं घेऊन उत्तीर्ण झाला. तर निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक असलेले विजयकुमार डेरले यांचे सुपुत्र आविष्कार डेरले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात ६०४ व्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला. येवल्यातून एकाने हे यश मिळवले आहे.