मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देशात पावसाची स्थिती कशी असेल, महाराष्ट्रात काय? बघा हवामान तज्ञाचा अंदाज

by Gautam Sancheti
एप्रिल 16, 2024 | 1:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 83

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
देशात जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीत देशात ९६ ते १०४% श्रेणीत पडणारा पाऊस हा जरी सरासरी इतका पाऊस मानला जात असला तरी भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या अंदाजानुसार या वर्षी देशात येत्या पावसाळ्यात गुणात्मकदृष्ट्या (क्वान्टीटेटिवली) १०६%±५% पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे नकारात्मक शक्यतेच्या अंकानुसार ही शक्यता (१०६-५) म्हणजे तरीदेखील १०१% येते, जी सरासरी इतक्या (९६ ते १०४%) पावसाच्या श्रेणीत मोडते. म्हणून देशात जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीत सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचीच शक्यता अधिक जाणवते .

यावर्षी २०२४ च्या पूर्वमोसमी काळात म्हणजे मार्च एप्रिल व मे २०२४ पर्यन्त ‘एल -निनो’ कमकुवत होण्याची शक्यता असून २०२४ च्या मॉन्सूनच्या पहिल्या दोन महिन्यात म्हणजे जून, जुलै महिन्यात एन्सो तटस्थेत होण्याच्या शक्यता जाणवते. मॉन्सूनच्या उर्वरित दोन महिन्यात म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ‘ला-निना’ चा उदगम होण्याची शक्यता जाणवते.

पावसाळ्याच्या जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीतील ऊत्तर्धात म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ‘ला-निना’ बरोबरच भारतीय महासागरात धन ‘ भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ (पॉझिटीव्ह इंडियन ओशन डायपोल) विकसित होण्याची शक्यताही आहे. शिवाय २०२४ च्या ह्या गेलेल्या जानेवारी ते मार्च तीन महिन्यात पृथ्वीच्या उत्तर-अर्ध गोलात तसेच यूरेशिया भागातील बर्फाळ देशात सरासरीपेक्षा कमी झालेली हिमवृष्टीमुळे म्हणजेच ह्या तिन्हीही अवस्था देशातील मान्सूनला अधिक पूरक असून देशाला सरासरीपेक्षा अधिक पाऊस देण्याची शक्यता जाणवत आहे.
कारण पॉझिटिव्ह आयओडी हा सुद्धा भारत देशाचा ‘ ला-निना ‘च समजला जातो, तसेच कमी हिमवृष्टी म्हणजे भारत देशात अधिक पाऊस पडण्यासाठी अनुकूलता मानली जाते. एकंदरीत देशात ह्या २०२४ च्या वर्षी ‘ ला -निना ‘ व आय.ओ.डी. व यूरेशियातील कमी हिमवृष्टीने ने पावसासाठी अनुकूलता दर्शवून सरासरी पेक्षा अधिक पाऊस होण्याच्या शक्यतेमुळे देशातील शेतकऱ्यांच्या आशा अधिकच पल्लवीत केल्या आहेत .

महाराष्ट्रासाठी काय?
महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. टरसाइल’ श्रेणी प्रकारनुसार संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक म्हणजे १०६ % पेक्षा अधिक पावसाचीच शक्यता असुन ही शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५% जाणवत आहे. मात्र ह्या सरासरी पेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेमुळे हा अधिक पावसाचे वितरण कसे होते ह्यावरच पडणारा पाऊस लाभदायी कि नुकसानदेही ह्याचे उत्तर येणारा काळच देईल, असे वाटते.

मॉन्सूनच्या आगमनासंबंधी
सरासरी तारीख १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. अर्थात केरळात आगमन झाल्यानंतरच मुंबईतील त्याच्या आगमनाची तारखेचा अंदाज बांधता येतो. मॉन्सून आगमन कालावधीत खालील ६ वातावरणीय घटकांच्या निरीक्षणानुसार मॉन्सूनच्या आगमनाची स्थिति त्या त्या वेळेस सांगितली जाते.
खरं तर मुंबईतल्या आगमनानंतरच तो उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येतो. हे जरी खरं असले तरी मान्सूनचे आगमन व ४ महिन्यात पडणारा मान्सून ह्या दोन स्वतंत्र गोष्टी असुन त्यांच्या भाकीतांचे निकषही स्वतंत्र आहेत.
i)वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान,
ii) दक्षिण भारतातील ४ राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन,
iii) दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणारी दिर्घलहरी उष्णता ऊर्जा,
iv) मलेशिया थायलंड पश्चिम कि. पट्टीवर १ ते दिड किमी. दरम्यानचे वाहणारे वारे
v) वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब
vi) बंगालच्या उपसागरातील, बांगला देश, इंडो्नेशिया, दरम्यानचा, पण साधारण १० किमी. उंचीवरील वाहणारा वारा
अश्या ह्या ६ घटकांचे सतत निरीक्षणावरून हा मान्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो. ३१ मे च्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाजात मॉन्सून आगमना संबंधी सविस्तर खुलासा केला जातो. तेंव्हाच अंदाजे मुंबईमध्ये मान्सून कोणत्या तारखेला दाखल होईल, हे कळते.

आज व उद्या (१५-१६ एप्रिल ला) दोन दिवस
विदर्भ – मराठवाड्यात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर मुंबईसह रायगड ठाणे रत्नागिरी पालघर ह्या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचीही शक्यता जाणवते. त्याचबरोबर संपूर्ण कोकण व गोव्यात मात्र दिवसा चांगलीच दमटयुक्त उष्णतेची काहिली व रात्री उकाडा जाणवू शकतो.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd )
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ…१९१ पाझर तलाव होणार गाळमुक्त, तब्बल साडेतीन कोटीचा खर्च

Next Post

दुर्दैवी घटना…मुंबई-आग्रा महामार्गावर आजोबासह नातींचा अपघाती मृत्यू, मालेगाव तालुक्यातील घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20240416 WA0112 1 e1713245322811

दुर्दैवी घटना…मुंबई-आग्रा महामार्गावर आजोबासह नातींचा अपघाती मृत्यू, मालेगाव तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011