इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि शरद पवार यांच्या सून सुनेत्रा पवार यांचे अश्रू अनावर झाले. त्यांना शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार आणि मूळ पवार या दोन गोष्टी असतात या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. पण, या वेळी त्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले.
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढाईत पवार या आडनावाच्या व्यक्तीलाच निवडून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले होते. तर त्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. एक घरातील पवार आणि बाहेरून आलेले पवार, या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे त्यांनी म्हटले होते.
शरद पवार यांच्या विधानानंतर विविध स्तरातून टीका करण्यात आली. महायुतीच्या महिला पदाधिकारी या विधानावर निशाणा साधला.