गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने केंद्र सरकारने उचलले हे पाऊल…

by India Darpan
एप्रिल 13, 2024 | 4:47 pm
in संमिश्र वार्ता
0
vij

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळ्यात देशात वाढलेली विजेची गरज भागवण्यासाठी भारत सरकारने वायू-आधारित वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांतून अधिकाधिक वीजनिर्मिती होण्याची खबरदारी घेण्यासाठी सरकारने विद्युत कायदा 2003 च्या कलम 11 अंतर्गत वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांना निर्देश जारी केले आहेत. (कलम 11 नुसार असामान्य परिस्थितीत उचित सरकार एखाद्या वीजनिर्मिती कंपनीकडे, त्या सरकारच्या निर्देशांनुसार, कोणतीही वीजनिर्मिती केंद्रे चालवण्याची किंवा सांभाळण्याची जबाबदारी सोपवू शकते).

मुख्यत्वे व्यावसायिक कारणांमुळे, GBS म्हणजे वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांचा बहुतांश भाग सध्या वापरात नाही. कलम 11 अंतर्गत काढलेले निर्देश, आयात केलेल्या कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांकरिता काढलेल्या निर्देशांशी मिळतेजुळते आहेत. मागणी उच्च असतानाच्या काळात वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांतून निर्माण होणाऱ्या विजेचे प्रमाण सुयोग्य पद्धतीने वाढवणे हा त्यामागील उद्देश आहे. वीजनिर्मिती आणि पुरवठा यांसंबंधीचे हे निर्देश 1 मे 2024 ते 30 जून 2024 या काळासाठी लागू असतील.

हे निर्देश येथे पाहता येतील–
विजेच्या गरजेबद्दलची माहिती ग्रिड-इंडिया कडून वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांना पुरवली जाणार-
विनिर्दिष्ट केलेल्या व्यवस्थेप्रमाणे, वायू आधारित प्रकल्पातून निर्माण केलेली वीज, किती दिवस पुरवावी लागेल याबद्दलची आगाऊ माहिती ग्रिड-इंडिया कडून वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांना पुरवली जाईल. PPA म्हणजे वीज खरेदी करार केलेली आणि वितरण परवाने असलेली वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रे प्रथम PPA करारबद्ध संस्थांना वीज देऊ करतील. जर अशी देऊ केलेली वीज एखाद्या PPA करारबद्ध संस्थेकडून वापरली गेली नाही तर, ती विजेच्या बाजारपेठेत उपलब्ध असेल. PPA करारबद्ध नसलेल्या वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांनी त्यांनी निर्माण केलेली वीज बाजारपेठेतच उपलब्ध करून दिली पाहिजे.

या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणांच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती स्थापित करण्यात आली आहे. उन्हाळ्यातील वीजगरज भागवण्याची काळजी घेण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या निरनिराळ्या उपायांचाच एक भाग म्हणून वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय वीज तथा नवीन आणि नवीकरणक्षम ऊर्जामंत्री आर.के.सिंग यांनी या विषयावर अनेक बैठका घेतल्या. उकाड्याच्या दिवसांत वाढलेली ऊर्जागरज भागवण्यासाठी येणारा भार लक्षात घेऊन तशा दृष्टीने पुरेसा पुरवठा करण्यावर या बैठकांमध्ये भर देण्यात आला.

वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांविषयीच्या निर्णयाखेरीज, उन्हाळ्यातील मागणीनुसार वीजपुरवठा करण्यासाठी सरकारने पुढील उपाययोजना केल्या आहेत-

  • वीजप्रकल्पांच्या देखभालीचे नियोजित काम पावसाळ्यात करणे
  • क्षमतेत वाढ करण्याच्या प्रक्रियेला वेग देणे
  • औष्णिक वीज प्रकल्पांच्या कामकाजावर अंशतः घालण्यात येणारी बंदी थांबवणे
  • कॅप्टिव्ह निर्मिती केंद्रांकडील अतिरिक्त वीज वापरात आणणे
  • अतिरिक्त वीज ऊर्जा एक्स्चेंजवर विक्रीसाठी उपलब्ध करून देणे
  • आयात केलेल्या कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांकरिता कलम 11 अंतर्गत काढलेल्या निर्देशांनुसार वीजनिर्मितीसाठी पूर्ण क्षमता उपलब्ध करून देणे
  • सर्वोच्च मागणी असण्याच्या काळात जलविद्युत निर्मिती केंद्रांचा उपयोग करणे
    कोळशाची उपलब्धता पुरेशी असण्याची काळजी घेण्यासाठी सर्व भागधारकांनी वेळेपूर्वीच नियोजन करून ठेवणे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरीरोडवर भरदिवसा घरफोडी…सहा लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला

Next Post

मोजणी यंत्राचे नुकसान करुन भूकरमापकास शिवीगाळ व दमदाटी…गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
crime diary 2

मोजणी यंत्राचे नुकसान करुन भूकरमापकास शिवीगाळ व दमदाटी…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011