मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील एसटी बसस्थानाकावर चालकाला एका महिलेसह चार जणांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. यामुळे एसटी कर्मचा-यांमध्ये प्रचंड संताप आहे. या घटनेनंतर मनमाड पोलीस स्थानकात मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, बसमध्ये बसण्या वरून वाद झाल्यानंतर चालकाला ही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल होत आहे.
एसटीमध्ये प्रवाशांमध्ये जागा पकडण्यावरुन वाद होत असतात. पण, बसमध्ये थेट चालकाशी वाद होऊन त्याला मारहाण करण्याची घटना मनमाडला घडली असून ती दुर्दैवी आहे.