मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असे आपणास आणि पक्षाला वाटले, यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? या विषयांवर ते पत्रकारांशी बोलले ते म्हणाले, मी नरेंद्र मोदी यांच्या काही धोरणांचा विरोधही केला आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा संधी देणे आवश्यक आहे, असे मला वाटले. त्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला. आता महाराष्ट्रासाठी आपल्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा संरक्षण, मराठी भाषेला अभिजात दर्जा हा विषय आहे असेही ते म्हणाले.
मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते
यावेळी ते म्हणाले, अनेक विषय प्रलंबित राहिले होते. त्यात राम मंदिराचा विषय राहू गेला होता. आता राम मंदिरासारखा विषय मार्गी लागला आहे. १९९२ पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले. त्यावेळी कारसेवकांवर गोळ्या घातल्या गेल्या. शरयू नदीत त्यांची प्रेते फेकले गेले होती. राम मंदिरासाठी चाललेले हे दीर्घ आंदोलन विसरता येणार आहे. राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
टीकेलाही दिले उत्तर
मनसेने पाठींबा दिल्यानंतर काही पदाधिका-यांना राजीनामा दिला. तर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. त्यावरही त्यांनी या पत्रकार परिषदेत उत्तर दिले.