अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नगर- कल्याण रस्त्यावर कर्जुलेहर्या जवळ पिकअपचा अपघात झाल्याने पाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला.
पिकअपमधील सर्व प्रवासी हे बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. हे सर्व जण मंचरहून पारनेरकडे यात्रेसाठी निघाले होते. या अपघात पिकअप थेट खड्ड्यात उलटली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या अपघातात पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे.
हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.