इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वंचित व एमआयएमला मतदान करु नका असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केल्यामुळे पुन्हा गांधी विरुध्द आंबेडकर असा वाद पेटण्याची शक्यता आहे. तुषार गांधी म्हणाले, भाजपच्या युतीला गद्दारांची युती म्हटले पाहिजे. या गद्दारांच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय झाला पाहीजे. यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करु नये.
देशात सध्या राष्ट्रीय पातळीवर इंडिया विरुध्द एनडीए अशी लढत सुरु आहे. तर राज्यात महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा सामना रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तुषार गांधी यांनी आपली भूमिका मांडली.
ते पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी मैत्रीभाव आहे. पण, त्यांनी एकत्र यायला हवं होते. त्यांच्या भूमिकेने भाजपलाच फायदा होणार आहे. ही लढाई लोकशाही विरुध्द हुकूमशाही अशी आहे. संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडीला मतदान करा असे सांगणार आहोत.