इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गडचिरोली जिल्हातील १४४२ ग्रामसभानी लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठींबा जाहीर करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत उपस्थित राहून ग्रामसभेच्या प्रतिनिधींचे प्रश्न समजून घेतल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
ते म्हणाले की, भाजपाने आदिवासी बांधवाना वनवासी म्हटले आहे. भाजपाने कधीही आदिवासी बांधवाना सन्मानाची वागणूक दिली नाही. काँग्रेस पक्षाने आदिवासी बांधवाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय नेते खा.राहुल गांधी यांनी दिलेल्या न्याय गॅरंटीत, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठीची भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील १४४२ ग्रामसभेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ग्रामसभेच्या समस्या ,आदिवासी समाजाचे प्रश्न त्यांचे कायदे त्यांची अंमलबजावणी याबाबत खालील मुद्दे मांडण्यात आले.
-संविधानातील 244 (1) नुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये पाचवी व सहावी अनुसुची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे
-पेसा 1996 व वनाधिकार कायदा 2006, 2008 तसेच सुधारीत नियम 2012 चे सर्व नियम पूर्णपणे लागू करणे
-गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासींची जनजाती सलाहकार परिषद तयार करणे
-20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जि. प. शाळा बंद करण्याचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा
-आदिवासींवर वेळोवेळी विनाकारणाने 110 कलम लावून त्यांना ऐनकामाच्या वेळी मानसिक त्रास देणे बंद करावे
-एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. आणि इतर यांच्या नोकरी वर्गामध्ये आरक्षणानुसार पदभरती करण्यात यावी
-जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेचे गडचिरोली जिल्ह्यातील १४४२ ग्रामसभेचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.