शुक्रवार, नोव्हेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशातील प्रमुख शहरातील निवासी मालमत्ता विक्री मूल्य १.११ लक्ष कोटींवर पोहोचले: या शहरात झाली इतकी वाढ

एप्रिल 12, 2024 | 1:23 am
in संमिश्र वार्ता
0
Proptiger Logo

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रॉपटायगरडॉटकॉमच्या रियल इनसाइट रेसिडेंशीयल – जानेवारी–मार्च २०२४’ अहवालानुसार, विकासाचा आलेख अनुसरत, भारतातील सर्वश्रेष्ठ आठ प्रायमरी रेसिडेंशीयल मार्केट्समध्ये या वर्षी जानेवारी ते मार्च (२०२४ ची पहिली तिमाही) या काळात प्रचंड मागणी चालू राहिली. जानेवारी-मार्च २०२४ या काळात मूल्याच्या बाबतीत निवासी मालमत्ता विक्री (घरांची विक्री) गत वर्षीच्या या कालावधीच्या ६६,१५५ कोटी रु. च्या तुलनेत ६८ टक्क्यांनी वाढून १,१०,८८० रुपयांवर पोहोचली आहे.

२०२४ च्या पहिल्या तिमाहीत निवासी मालमत्ता विक्री मूल्यात सर्वाधिक वाढ दिल्ली एनसीआर (२४९ टक्के) मध्ये झाली असून यानंतर हैदराबाद (१४३ टक्के), अहमदाबाद (१३० टक्के), कोलकता (५९ टक्के), बंगळुरू (५२ टक्के), पुणे (३२ टक्के), मुंबई-एमएमआर (३१ टक्के), आणि चेन्नई (२२ टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो. या शहरांचे विक्री मूल्य अनुक्रमे १२,१२०, २३,५८०, ९,०९०, २,०००, ११,३१०, १५,१५०, ३४,३४० आणि ३,२९० कोटी रुपये झाले आहे.

क्षेत्रफळाच्या बाबतीत घरांची विक्री ९९ दशलक्ष चौरसफुटांपासून ६३% वाढून १६२ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली आहे. यात दिल्ली एनसीआर (१८४ टक्के)सह आघाडीवर असून यानंतर हैदराबाद (१२८ टक्के), अहमदाबाद (१०८ टक्के), कोलकता (४९ टक्के), बंगळुरू (३९ टक्के), मुंबई-एमएमआर (२६ टक्के), पुणे (२१ टक्के), आणि चेन्नई (१६ टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो.

प्रोपटायगर डॉटकॉमच्या अहवालामध्ये या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निवासी मालमत्ता विक्री गेल्या वर्षी या कालावधीतील ८५८४० घरांच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी वाढून १,२०,६४० घरांवर पोहोचली असल्याचे दिसून आले आहे. घरांच्या विक्रीतही दिल्ली एनसीआर (१६४ टक्के) वार्षिक वाढीसह आघाडीवर असून यानंतर अहमदाबाद (७८ टक्के), कोलकता (७३ टक्के), हैदराबाद (४० टक्के), बंगळुरू (४० टक्के), मुंबई-एमएमआर (२८ टक्के), पुणे (२२ टक्के),आणि चेन्नई (२२ टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो. या शहरांत अनुक्रमे १०,०६०, १२,९२०, ३,८६०, १४,२९०, १०,३८०, ४१,५९०, २३,११० आणि ४,४३० घरांची विक्री नोंदवण्यात आली आहे.

या अहवालात म्हटले आहे की, “एकंदर व्यवहाराचे मूल्य’ किंवा ‘विक्री मूल्य’ २०२४ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान एका शहरात विकल्या गेलेल्या मालमत्तेच्या एकंदर मूल्याशी संबंधित आहे. विकलेल्या एकंदर घरांच्या संख्येला वेटेड अॅव्हरेज प्राइसने गुणून व त्यात मालमत्तांच्या वेटेड अॅव्हरेज साइझने गुणून हे मूल्य प्राप्त करण्यात येते. मूलतः ते निर्दिष्ट कालावधीत त्या शहरातील सर्व विक्री व्यवहारांचे मौद्रिक मूल्य समाविष्ट करते.

प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख आणि आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ श्री. विकास वधावन म्हणाले, “आकारमान आणि मूल्याच्या बाबतीत निवासी मालमत्ता विक्रीतील वाढ ही एकंदर अर्थव्यवस्थेसाठी शुभ म्हटली पाहिजे, कारण सिमेंट आणि स्टील सहित २०० पेक्षा जास्त साहाय्यक उद्योग हे रियल इस्टेट क्षेत्रावर अवलंबून आहेत. भारतातील हाऊसिंग मार्केटची घोडदौड जबरदस्त सुरू आहे. टॉप ८ प्रायमरी मार्केट्समध्ये निवासी मालमत्तेची विक्री झपाट्याने वाढत आहे. ज्यामागील परीबळे आहेत मजबूत विकास, स्थिर तारण दर आणि आपल्या मालकीचे घर घेण्याची प्रबळ इच्छा. जसजसा गुंतवणूकदारांचा विश्वास हळूहळू पुनर्जीवित होत आहे आणि त्याला अनिवासी भारतीयांच्या मजबूत मागणीची जोड मिळत आहे, घरांच्या मागणीचा आलेख, किंमतीतील काही अनपेक्षित चढ-उतार वगळता, दमदार वृद्धीसाठी तयार झालेला दिसत आहे.”

प्रॉपटायगर डॉटकॉम आणि हाऊसिंग डॉटकॉमची संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद म्हणाल्या, “गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मालमत्ता विक्रीच्या एकंदर व्यवहार मूल्यात ६८% इतकी असामान्य वाढ झाली आहे. उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, मुंबई, हैदराबाद, दिल्ली एनसीआर आणि पुणे यांचा एकत्रित वाटा १.११ लक्ष कोटी रुपयांच्या एकंदर व्यवहार मूल्यात ७६% इतका आहे. या वृद्धीवरून केवळ वाढती मागणी लक्षात येत नाही, तर प्रमुख व्यावसायिक जिल्ह्यांत मालमत्तेच्या किंमतीतील १५-२० टक्क्यांची लक्षणीय वाढ देखील दिसून येते. येत्या दोन तिमाहींमध्ये सुद्धा वाढीचा हा आलेख आर्थिक वृद्धी आणि मजबूत मागणीचा रेटा मिळून आणखी वर वर जाईल अशी अपेक्षा आहे.”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

९८ वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पहिल्या गृह मतदार

Next Post

घरफोड्या करण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करणाऱ्या चोराला पोलिसांनी केले गजाआड

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
jail11

घरफोड्या करण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करणाऱ्या चोराला पोलिसांनी केले गजाआड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011