बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

९८ वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पहिल्या गृह मतदार

by India Darpan
एप्रिल 12, 2024 | 1:16 am
in राज्य
0
WhatsApp Image 2024 04 11 at 2.10.24 PM 555x375 1

भंडारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चुनाव का पर्व, देश का गर्व, ह्या घोषवाक्यानुसार भारतीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा- गोंदिया मतदारसंघासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने प्रथम गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. यामध्ये 85 वर्षांहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी 12 डी नमुना भरून दिला, त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया करण्यात आली.

मूळ साकोली येथे रहिवासी असणाऱ्या जैनबी जब्बार कुरेशी ह्या 98 वर्षाच्या असून आजारामुळे त्या अंथरुणाला खिळून आहेत. अनेक वर्ष झाले त्यांनी मतदानामध्ये सक्रिय मतदान केले नव्हते. कारण मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्यांना आधार घेत जावे लागत होते. त्यामुळे अमूल्य मताधिकारापासून त्या वंचित राहत होत्या, मात्र आयोगाने गृह मतदान सुविधा उपलब्ध करून दिल्याने या लोकसभा निवडणुकीसाठी जैनबी जब्बार कुरेशी यांनी मतदान केले.

दोन मुलं आणि दोन मुली असलेल्या जैनबी यांच्या कुटुंबांमध्ये त्यांचे पुत्र कलीम जब्बार कुरेशी यांनी गृह मतदान प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच मतदान प्रक्रिया गोपनीयतेने पार पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये गृह मतदानाची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पहिल्या दोन दिवसात 1243 मतदारांनी मताधिकार बजावला.

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ 7 एप्रिल रोजी करण्यात आला. जैनबी यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले.

मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सूचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये जैनबी यांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्या जवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफ्यामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नागपूरमध्ये भर पावसात काँग्रेसच्या उमेदवाराने केला प्रचार… नागरिकांनी उत्साहात केले स्वागत

Next Post

देशातील प्रमुख शहरातील निवासी मालमत्ता विक्री मूल्य १.११ लक्ष कोटींवर पोहोचले: या शहरात झाली इतकी वाढ

India Darpan

Next Post
Proptiger Logo

देशातील प्रमुख शहरातील निवासी मालमत्ता विक्री मूल्य १.११ लक्ष कोटींवर पोहोचले: या शहरात झाली इतकी वाढ

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011