इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी गुरुवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसात प्रचार केला. विशेष म्हणजे भर पावसातही मोठ्या संख्येत दक्षिण-पश्चिम नागपूरच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत केले.
आग्याराम देवी मंदिरापासून यात्रेची सुरुवात झाली. यानंतर शनिवारी-डालडा कंपनी-मोक्षधाम घाट-बोरकर नगर-रामेश्वरी-शताब्दी चौक-नरेंद्रनगर-बेसा रोड-मनीष नगर-वैशालीनगर मार्गे यात्रा चिंचभुवन पर्यंत निघाली. यावेळी मोठ्यासंख्येत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यासोबतच सायंकाळी मध्य नागपुरातील बजेरिया येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत प्रामुख्याने माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद यांची उपस्थिती होती.