चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाती स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला,गॅस कटरच्या सहाय्याने मशिन कापले मात्र त्याच वेळी त्या ठिकाणी दूध डेरीची गाडी आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.
दूध डेअरीच्या गाडीमुळे एटीएम मधून होणारी चोरी टळली. यावेळी चोरट्यांना खाली हात हलवत पळावे लागले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह गुन्हे शाखेचे पथक पोहचत त्यांनी एटीएम मधील सीसीटीव्ही तपासत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करत तपास सुरु केला आहे.
याअगोदर जिल्ह्यात काही ठिकाणी एटीएम फोडणा-यांना चोरांना असेच माघारी फिरावे लागले. तर काही ठिकाणी त्यांनी एटीएम फोडून चोरी केली. विशेष म्हणजे हे चोर संपूर्ण माहिती घेऊन चोरी करतात.