इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. आज वाघाची शेळी झाली आहे अशा शब्दात राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी बोचरी टीका केली.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, राज ठाकरे या लढवय्या नेत्याने भाजपच्या गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले ?
आधी थोडेसे झुकले होते आता कमरेतून झुकले, हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त जाहीर पाठींबा दिल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर विरोधी पक्षांनी निशाणा साधला आहे. त्यात वडेट्टीवार यांनी बोचरी टीका केली आहे.