नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०२४ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात पुन्हा कधीही निवडणुका होणार नाहीत. देशाचे संविधान बदलेल. मोदी स्वतः लाल किल्ल्यावरून द्वेषपूर्ण भाषण देतील आणि संपूर्ण देशात लडाख-मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल. असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती सुप्रिध्द अर्थतज्ञ परकला प्रभाकर ने एका युट्युब चॅनवरील मुलाखतीत सांगितल्याचा दावा करत काँग्रेसने या संपूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या दाव्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मणिपूरसारखी स्थिती संपूर्ण देशात होऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केल्याचे या मुलाखतीत म्हटले आहे. १ मिनिटं ४० सेकंदाचा हा व्हिडिओ काँग्रेसने शेअर केला आहे. तो बघा ….