मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालघर लोकसभा मतदार संघात राजेंद्र गावित हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गावित शिवसेना शिंदे गटाचे खासदार असून ते सलग दोन टर्म खासदार आहे. त्यामुळे त्यांनी विजयाची हॅट्रीक करण्याची संधी असली तरी त्यांना पक्ष बदलावा लागणार आहे.
२०२८ च्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित हे भाजपकडून निवडून आले होते. पण, २०१९ च्या निवडणुकीआधी शिवसेना – भाजपमध्ये पुन्हा युती झाली. त्यावेळेस राजेंद्र गावित यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय़ झाला. पण, पारंपारिक जागावाटपानुसार पालघर मतदार संघ शिवसेनेकडे असल्यामुळे गावितांना शिवसेनेत प्रवेश करावा लागला. त्यानंतर ते विजयी झाले.
आता राज्यातील बदलल्या परिस्थितीनुसार महायुतीच्या जागा वाटपात पालघरची जागा भाजपकडे जाणार आहे. त्यामुळे राजेंद्र गावित हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.