इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेश मधील बस्ती जिल्ह्यातील निकिता नावाच्या मुलीने घरात माकडे घुसल्यावर अलेक्सा यंत्राचा आवाज वापरून आपल्या लहान बहिणीला आणि स्वतःला वाचवले.
निकिता सांगते, “आमच्या घरी काही पाहुणे आले आणि त्यांनी गेट उघडे ठेवले. माकडं स्वयंपाकघरात घुसली आणि इकडे तिकडे वस्तू फेकायला लागली. मुल घाबरले होती. त्यावेळे मग मी अलेक्साला पाहिले आणि त्याला आवाज वाजवायला सांगितला. कुत्र्याच्या त्या भुंकण्याच्या आवाजामुळे माकडे घाबरली आणि पळून गेली.
या लहानग्या मुलींच्या कामगिरीवर खूश होत प्रसिध्द उद्योजक महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी तिला थेट नोकरीची ऑफर दिली. महिंद्र यांनी सोशल प्लॅटफॅार्मवर एक पोस्ट टाकली. त्यात म्हटले आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होणार की स्वामी बनणार हा आपल्या काळातील प्रमुख प्रश्न आहे. या तरुणीच्या कथेतून दिलासा मिळतो की तंत्रज्ञान नेहमीच मानवी कल्पकतेला सक्षम बनवते.तिची द्रुत विचारसरणी विलक्षण होती. तिने जे दाखवून दिले ते संपूर्णपणे अप्रत्याशित जगात नेतृत्वाची क्षमता होती. तिने तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जर तिने कॉर्पोरेट जगतात काम करण्याचा निर्णय घेतला तर मला आशा आहे की आम्ही ते करू तिला आमच्यात सामील होण्यासाठी पटवून देऊ शकेल.