इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटात आ. रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खेकडा आणला होता. त्यांच्या या कृतीवर प्राणी अधिकार संघटना ‘पीपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल’ अर्थात ‘पेटा’ ने निवडणूक आयोग आणि शरद पवार यांना पत्र पाठवून आ.पवार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
या तक्रारीनंतर आ.रोहित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्यामुळे भाजप चांगलाच रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय आणि यातूनच त्यांनी माझ्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं…
वास्तविक मी दाखवलेला खेकडा हॉटेलमध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणार होता आणि नंतर तो नदीत सोडून दिल्याने उलट त्याचा जीव वाचला, पण तिकडं भाजपची मात्र यामुळं तडफड सुरू झाली. याचं कायदेशीर उत्तर मी देईलच पण तुम्ही काय म्हणणार अशा या बावचळलेल्या राजकीय खेकड्यांना…