येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराला पाणी पुरवठा करणा-या गंगासागर तलावात मित्रांसह तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सांयकाळी घडली. अमन अली शाह असे २१ वर्षीय तरुणाचे नाव आहे.
नुकतेच गंगासागर तलावात पाणी आलेले आहे. त्यामुळे अमन आपल्या मित्रांसोबत अंघोळीला गेला होता. त्याचा पाय घसरुन तो पाण्यात बुडाला याची माहिती मित्रांनी घरच्यांना दिली. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक साठवण तलावाजवळ पोहचले.
त्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तीन तासाच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह रात्री आठ वाजेच्या सुमारास सापडला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर मात्र शोककळा पसरली.