मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी डॉ.दिनेश शर्मा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
आगामी लोकसभा निवडणुकीतील महायुतीचा प्रचार आणि अन्य राजकीय विषयांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
महायुतीमध्ये तीनी पक्षांचे समन्वय रहावे यासाठी प्रभारी शर्मा यांची मोठी भूमिका असणार आहे.