इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव लोकसभा मतदार संघात तिकीट कापल्यामुळे नाराज असलेले खासदार उन्मेश पाटील यांनी आज खा.संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर उदया शिवसेना ठाकरे गटात ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे पाटील नाराज आहे.
ठाकरे गटाता प्रवेश केल्यानंतर पाटील यांना उमेदवारी दिली जाते की त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाते हे अद्याप निश्चित नाही. त्याचप्रमाणे करण पवार यांचे नाव सुध्दा चर्चेत आहे. आज ते सुध्दा त्यांच्याबरोबर होते. करण पवार हे पारोळा येथील माजी नगराध्यक्ष आहे.
दरम्यान या भेटीनंतर भाजपने उन्मेश पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी उन्मेश पाटील यांना फोन करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उन्मेश पाटील भाजपमध्ये राहतात की ठाकरे गटाची वाट निवडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.