नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नामचिन गुंडास पोलीसांनी स्थानबध्द केले आहे. मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. नाशिकरोड भागातील वर्चस्वासाठी दहशत निर्माण करून नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्याचे काम हा गुंड करत होता. दिपक राजू डोंगरे (२१ मुळ रा.निमगांव ता.जि.नांदेड सध्या श्रमिकनगर झोपडपट्टी,कॅनलरोड जेलरोड) असे स्थानबध्द करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.
नाशिकरोड व परिसरात दहशत कायम राहवी यासाठी डोंगरे नागरीकांमध्ये भिती निर्माण करीत होती. धारदार शस्त्राचा धाक दाखवून,जबरी चोरी,खूनाचा प्रयत्न,लुटमार,गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण अशी कृत्य सातत्याने करून त्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्याच्या गुन्हेगारीला प्रतिबंध होणेसाठी त्याच्याविरूध्द वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच हद्दपारीचीही कारवाई करण्यात आली होती.
मात्र त्याने आपले गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवल्याने पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांच्या आदेशान्वये ही कारवाई करणयत आली. डोंगरे याच्याविरूध्द नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत खूनाचा प्रयत्न,इच्छापूर्वक दुखापत करणे,घातक हत्यारांनी दुखापत व गंभीर दुकापत,फौजदारी पात्र धाकदटशा, चोरी, घरफोडी, शस्त्र बाळगणे, जाळपोळ तसेच मनाई आदेशाचे उलंघन आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हद्दपार करण्यात आलेल्या तडिपारास अटक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने गुन्हेगारी कारवायामुळे शहर आणि जिह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या तडिपारास अटक केली. ही कारवाई देवळाली कॅम्प येथील लेव्हीड मार्केट भागात केली. दिपक चिंतामण भालेराव (२३ रा.हाडोळा,दे.कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे.
भालेराव याच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर शहर पोलीसांनी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. मात्र त्याचा वावर शहरात होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना सोमवारी (दि.१) युनिटचे हवालदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित पोलीसांच्या जाळयात अडकला. लेव्हीट मार्केट भागात तो फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.
याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक व्ही.डी.श्रीमनराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव,हवालदार गुलाब सोनार,सुहास क्षिरसागर,संजय सानप,संजय पोटींदे आदींच्या पथकाने केली.