सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संरक्षण निर्यात इतक्या कोटीवर पोहोचली… ३२.५ टक्के वाढ

by India Darpan
एप्रिल 2, 2024 | 12:26 am
in राष्ट्रीय
0
Untitled 5

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यातीने विक्रमी 21,083 कोटी ( सुमारे 2.63 अब्ज अमेरिकन डॉलर्स) रुपयांचा उच्चांक गाठला आहे. जी गेल्या आर्थिक वर्षातील 15,920 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीच्या तुलनेत 32.5% नी अधिक आहे. आर्थिक वर्ष 2013-14 च्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत संरक्षण निर्यात 31 पटीने वाढल्याचे या ताज्या आकडेवारीवरून दिसून येते.

संरक्षण उद्योग, संरक्षण क्षेत्रातील खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक उपक्रमांनी सर्वोच्च संरक्षण निर्यात साध्य करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. या आकडेवारीत खाजगी क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे योगदान अनुक्रमे 60% आणि 40% आहे.

याव्यतिरिक्त, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यातदारांना जारी करण्यात आलेल्या निर्यात परवान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील 1,414 निर्यात परवान्यांच्या तुलनेत 2023-24 मध्ये ही संख्या 1,507 वर पोहोचली आहे.

दोन दशकांची तुलनात्मक आकडेवारी म्हणजे 2004-05 ते 2013-14 आणि 2014-15 ते 2023-24 या कालावधीत संरक्षण निर्यातीत 21 पट वाढ झाल्याचे दिसून येते. 2004-05 ते 2013-14 या कालावधीत एकूण संरक्षण निर्यात 4,312 कोटी रुपये होती, जी 2014-15 ते 2023-24 या कालावधीत 88,319 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

ही वृद्धी भारतीय संरक्षण उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक मान्यतेचे प्रतिबिंब आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी X या समाज माध्यमावरील पोस्टद्वारे संरक्षण निर्यातीत नवा टप्पा पार केल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळांना नोटीस…अंजली दमानिया यांनी दिली ही माहिती

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबद्दल हे माहित आहे का….

Next Post
mpsc11

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबद्दल हे माहित आहे का….

ताज्या बातम्या

court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011