मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. या प्रकरणात ९ सप्टेंबर २०२३ रोजी भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. पण, या निर्णयाविरोधात दमानिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर नोटीस बजावण्यात आली आहे.
दमानिया यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, महाराष्ट्र सदन घोटाळा; आज मुंबई हाय कोर्टाच्या जस्टिस मोडक समोर मॅटर लिस्टेड होत. भुजबळांना सेशन कोर्टातून मिळालेला डिसचार्ज हा कसा चुकीचा आहे याची माहिती कोर्टाला दिली. कोर्टाने सर्व आरोपींना नोटिस देण्याचे आदेश दिले.
आम्ही कोर्टाला विनंती केली के या नोटिस ACB ने आरोपींना द्याव्यात. कोर्टाने आमची मागणी मंजूर केली. आता या नोटीस २९ तारखे पर्यंत returnable आहेत.
दोषींना शिक्षा नक्कीच होणार या शंका नाही.
एकीकडे नाशिक लोकसभा मतदार संघातून भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असतांना त्यांना निर्दोष झालेल्या प्रकरणात पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहे.