नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकल ते ग्लोबल असा अभिमानास्पद प्रवास करणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या १०१ व्या वर्षाचा ज्ञानयज्ञ परंपरेप्रमाणे दि. १ ते ३१ मे २०२४ पर्यंत दररोज सायंकाळी ७:१५ वाजता गोदाघाटावरील देवामामलेदार यशवंतराव महाराज पटांगण येथे संपन्न होणार आहे.
व्याख्यानमालेचे उदघाटकीय पुष्प ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक जगतगुरू स्वामी रामभद्राचार्य हे रामराज्याची संकल्पना या विषयावर गुंफणार आहेत. यावेळी प्रथेप्रमाणे व्याख्यानमालेचा शुभारंभ नाशिक महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ज्ञानपीठ मंडळाचे महाप्रबंधक आर. एन. तिवारी, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, आदिवासी विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, HAL चे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जगतगुरु स्वामी रामभद्राचार्य हे चित्रकूट येथील विकलांग विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. ते तब्बल बावीस भाषा बोलतात. त्यांनी आजवर 240 पुस्तके लिहिली असून त्यांचे 50 शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. भारतीय हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षणतज्ञ, संस्कृत विद्वान, बहुभाषिक, कवी, लेखक, भाष्यकार, संगीतकार त्याचबरोबर गायक, नाटककार, कथाकलाकार म्हणून स्वामीजी प्रसिद्ध आहेत. दृष्टीहीन असूनही स्वामीजींनी एव्हढी मोठी उंची गाठली आहे. 4 महाकाव्ये, तुलसीदासांचे रामचरितमानस, हनुमानचालीसा या विषयांतील चिकित्सक अभ्यासक म्हणून स्वामीजी जगभरात प्रसिद्ध आहेत. यावर्षीचा भारताचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार “ज्ञानपीठ पुरस्कार” मिळाल्याबद्दल स्वामी रामभद्राचार्य यांचा नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
यावर्षीच्या व्याख्यानमालेचे आयोजन करताना तरुण पिढी अधिकाधिक आकर्षित व्हावी याउद्देशाने जगभरातील १० मराठी व्यक्तिमत्वांना व्याख्यानांकरिता आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विजय जोशी (ऑस्ट्रेलिया), अभि घोलप, निलेश ओक, आनंद गानू (अमेरिका), प्रा. अजित जावकर, प्रा. रविंद्र गाडगीळ (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लंडन), अशोक विखे पाटील ( स्वीडन), डॉ. मनोज कुलकर्णी (हॉंगकॉंग), हेरंब कुलकर्णी (फिनलंड), जादूगार किमया देशमुख (कॅनडा) यांचा समावेश आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, ज्येष्ठ अस्थीरोगतज्ञ पद्मभूषण डॉ. एम. एस. लाड, सुप्रसिद्ध विधिज्ञ श्रीहरी अणे, व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, सनदी अधिकारी विजय सूर्यवंशी, ओमप्रकाश शेटे, लष्करी अधिकारी सुप्रिया चित्रे, गणेश एलिस, विचारवंत भालचंद्र कांगो, शमसुद्दीन तांबोळी, ब्रह्मकुमार डॉ. प्रेम मसंद आदी व्याख्यानमालेत आपले विचार मांडणार आहेत. गतवर्षीच्या महाराष्ट्राची हस्यजत्रा कार्यक्रमाच्या धरतीवर भव्य ग्रँड फिनाले समारोपाचेवेळी आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व्याख्यानमालेच्या यु ट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तसेच व्याख्यानमालेच्या www.vvmalanashik.org या वेबसाईटवर सदर व्याख्याने कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहेत. तसेच स्थानिक केबल नेटवर्कद्वारे बालाजी TV चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा श्रोत्यांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा असे आवाहन वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्ष विजय हाके, सौ. उषा नवलनाथ तांबे, कार्याध्यक्ष संगिता बाफणा, कार्योपाध्यक्ष मनीष सानप, चिटणीस हेमंत देवरे, सहचिटणीस गणेश भोरे, ऍड. हेमंत तुपे, खजिनदार अविनाश वाळुंजे, कार्यकारी मंडळ सदस्य रुचिता ठाकूर, संदीप नाटकर, कांतीलाल तातेड, विजय काकड, कृष्णा शहाणे, अंतर्गत हिशेब तपासणीस सुनिल गायकवाड आदींनी केले आहे.
वसंत व्याख्यानमाला, नाशिक.*
दि. १ मे ते ३१ मे २०२४, सायं ७:०० वाजता
स्थळ :- देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी,
नाशिक – ३.
कार्यक्रम पत्रिका
बुधवार दि. १ मे २०२४
उदघाटन समारंभ
उदघाटकीय वक्ते :- जगतगुरु स्वामी रामभद्राचार्य
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक
कुलगुरू, जगतगुरु रामभद्राचार्य दिव्यांग विद्यापीठ, चित्रकूट
विषय :- रामराज्याची संकल्पना
गुरूवार दि. २ मे २०२४
वक्ते :- श्री बाबासाहेब सौदागर
गीतकार, श्रीरामपूर
विषय :- माझ्या गाण्यांची जन्मकथा
शुक्रवार दि. ३ मे २०२४
वक्ते :- श्री अभि घोलप
चित्रपट निर्माते, कॅलिफोर्निया, अमेरिका
विषय :- मराठी सिनेमा – अमेरिकन ड्रीम
शनिवार दि. ४ मे २०२४
वक्ते :- पद्मभूषण डॉ. एम. एस. लाड
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अस्थीरोग तज्ञ, मुंबई
विषय :- आत्मनिर्भर आरोग्यसेवा
रविवार दि. ५ मे २०२४
वक्ते :- ऍड. श्रीहरी अणे
ज्येष्ठ विधिज्ञ, नागपूर
विषय :- पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटा व उपाय
सोमवार दि. ६ मे २०२४
वक्ते :- श्री प्रकाश आमटे, सौ. मंदाकिनी आमटे
विषय :- लोक बिरादरी प्रकल्पाचा प्रवास
मंगळवार दि. ७ मे २०२४
वक्ते :- श्री विलास शिंदे
चेअरमन, सह्याद्री फार्म्स, मोहाडी
विषय :- शेतकऱ्यांच्या सरकारकडून अपेक्षा
बुधवार दि. ८ मे २०२४
वक्ते :- श्री प्रशांत कुलकर्णी
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार, मुंबई
विषय :- रेषा, भाषा आणि हंशा
गुरूवार दि. ९ मे २०२४
वक्ते :- डॉ. ओमप्रकाश शेटे
प्रमुख, आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र राज्य
विषय :- सात्विक रुग्णसेवा
शुक्रवार दि. १० मे २०२४
वक्ते :- प्रा. अजित जावकर
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लंडन
विषय :- कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास
AI (ARTIFICIAL INTELLIGENCE)
शनिवार दि. ११ मे २०२४
वक्ते :- श्री आनंद गानू सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका
संस्थापक, गर्जे मराठी फाउंडेशन
विषय – भारत वैश्विक महासत्ता : महाराष्ट्राचे योगदान
रविवार दि. १२ मे २०२४
वक्ते :- प्रा. रविंद्र गाडगीळ
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लंडन
विषय :- महाराष्ट्रीयन माणसे – स्थानिक छटा असलेला जागतिक खजिना
सोमवार दि. १३ मे २०२४
वक्ते :- श्री अशोक विखे पाटील, स्वीडन
ज्येष्ठ शिक्षण व सार्वजनिक आरोग्य तज्ञ
विषय :- भारताच्या शाश्वत विकासासाठी काही आव्हाने !
मंगळवार १४ मे २०२४
वक्ते :- निवृत्त स्क्वाड्रन लीडर सुप्रिया चित्रे
लेफ्टनंट कर्नल गणेश एलिस
विषय :- युद्ध आणि योद्धा
बुधवार दि १५ मे २०२४
वक्ते :- श्री भालचंद्र कांगो, नवी दिल्ली
ज्येष्ठ विचारवंत
विषय :- आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र
गुरूवार दि. १६ मे २०२४
वक्ते :- आ. सत्यजीत तांबे, संगमनेर
विषय :- भारत : १९४७ ते २०४७
शुक्रवार दि. १७ मे २०२४
वक्ते:- श्री विजय सूर्यवंशी
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य
विषय :- सहयोगी शासन – प्रशासनातील लोकसहभाग
शनिवार १८ मे २०२४
वक्ते :- शमसुद्दीन तांबोळी
अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, पुणे
विषय :- समान नागरी कायदा
वास्तव, अपेक्षा आणि सुधारणा
रविवार दि. १९ मे २०२४
वक्ते :- श्री पियुष सोमाणी
चेअरमन, ई एस डी एस सॉफ्टवेअर सोल्युशन्स
विषय :- आम्ही नाशिककर
सोमवार दि. २० मे २०२४
वक्ते :- प्राचार्य भगवान इंगळे, मुंबई
ज्येष्ठ साहित्यिक
विषय :- उभारणी
मंगळवार दि. २१ मे २०२४
वक्ते :- श्री उत्तमराव / अनिकेत गाढवे
संचालक, श्री इच्छामणी केटरर्स
विषय :- भारताची विभिन्न खाद्यसंस्कृती आणि परंपरा
बुधवार दि. २२ मे २०२४
वक्ते :- ब्रह्मकुमार डॉ. प्रेम मसंद, माऊंट अबू
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय
विषय :- संकल्पांची शक्ती
गुरूवार दि. २३ मे २०२४
वक्ते :- डॉ. मनोज कुलकर्णी, हॉंगकॉंग
पुरवठा साखळी व्यवस्थापन तज्ञ
विषय :- चीनच्या सप्लाय चेनची सद्यस्थिती – चीनच्या उंबरठ्यावरून
शुक्रवार दि. २४ मे २०२४
वक्ते :- श्री निलेश ओक, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
लेखक, संशोधक, TEDx – Keynote वक्ता
विषय :- नक्षत्रांचे देणे – भारताचा विज्ञाननिष्ठ ईतिहास
शनिवार दि. २५ मे २०२४
वक्ते :- श्री. हेरंब कुलकर्णी, फिनलंड
प्रगतिशील शिक्षणतज्ञ, तंत्रज्ञान तज्ञ
विषय :- Education 4.0 : नवे शैक्षणिक धोरण आणि फिनलंड शिक्षण पद्धतीचा संगम
रविवार दि. २६ मे २०२४
वक्ते :- श्री. विजय जोशी, ऑस्ट्रेलिया
ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कृत संशोधक
विषय :- मजबूत व गुणवत्तापूर्ण रस्ते आणि महामार्गांची बांधणी
सोमवार दि. २७ मे २०२४
वक्ते :- जादूगार सतीश देशमुख व किमया देशमुख, मुंबई / कॅनडा
विषय :- मनाचा शोध आणि वाचन
मंगळवार दि. २८ मे २०२४
वक्ते :- प्रा. डॉ. गणेश गोविलकर, नाशिक
विषय :- मरिता मारीता मरेतो झुंजेन
बुधवार दि. २९ मे २०२४
वक्ते :- ऍड. सुधाकर आव्हाड, पुणे
ज्येष्ठ विधिज्ञ
विषय :- भारतीय संविधान – अमृत मंथन
दि. ३० मे २०२३
वक्ते :- श्री. संतोष आंधळे पत्रकार , मुंबई
विषय :- वैद्यकीय विषयातील अवयव प्रत्यारोपण
शस्त्रक्रियेतील प्रगती, अवयवदानाचे बदलते स्वरूप आणि महाराष्ट्र
दि. ३१ मे २०२३
समारोप समारंभ
ग्रँड फिनाले
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व्याख्यानमालेच्या यु ट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तसेच व्याख्यानमालेच्या या वेबसाईटवर सदर व्याख्याने कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहेत. तसेच स्थानिक केबल नेटवर्कद्वारे बालाजी TV चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा श्रोत्यांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा.
स्वागतोत्सुक
कार्यकारी मंडळ,
वसंत व्याख्यानमाला, नाशिक.