इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आजही दिलासा मिळाला नाही. त्यांना राऊज ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी ठोठावली आहे. आता त्यांना १५ एप्रिलपर्यंत तिहार जेलमध्ये काढावे लागणार आहे.
२१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर २८ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना १ एप्रिल पर्यंत ईडी कोठडी दिली होती. यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ईडीनेच ही मागणी केली ती न्यायालयाने मान्य केली.
केजरीवाल यांनी त्यांच्या डिजिटल डिव्हाइसचे पासवर्ड दिलेले नाहीत. तसेच त्यांचे वागणे असहकाराचे आहे. कोणत्याही प्रश्नाचे ते योग्य उत्तर देत नाहीयेत, फक्त उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, असे ईडीने नमूद केले. या सुनावणीच्या वेळी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवालही कोर्टात हजर होत्या.